अनाथ आश्रमातील मुलांना आज अन्न वाटप

0
529

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 13 सोनवणे वस्ती चिखली येथे विकास अनाथ आश्रम येथील लहान मुलांना आज अन्न वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा नेते मनोज भाऊ जरे यांच्यातर्फे खाऊवाटप करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष लवकुश यादव, शहर सरचिटणीस दीपक गुप्ता, शहर सचिव कुणाल कडू, युवा नेते राहुल सिंग, विजय जरे, दत्ता जरे, मनोज होरे, दीपक कांबळे,संजय शिंदे आणि इतर सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोसरी विधानसभा सरचिटणीस रोहित खोत यांनी केले.