अनाथांचा आधार कोविड योद्धा सामाजिक कार्यकर्ता युनुस पठाण यांची अनोळखी इसमाला मदत :

0
170

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध रुग्णालया संदर्भात गोरगरीब गरजू उपचाराकरिता दवाखान्यांचे रुग्णालयांचे उंबरटे झिजवणाऱ्या असंख्य लोकांचे परिचित आधारवड समजले जाणारे सामाजिक कार्यातून आपल्या रुग्णसेवेची छटा उमटवणारे युनुस पठाण हे सगळ्यांच्या परिचयाचे असून १६ जानेवारी २०२४ रोजी रात्री उशीरा रुग्णसेवीचे काम उरकून युनूस पठाण हे आपल्या निवासस्थानी गेले असता तसेच दिवसभराच्या दैनंदिन रुग्णसेवेच्या नंतर क्षणभर विश्रांती करिता विश्रांती घेत असताना रात्रीच्या तीन वाजता त्यांच्या मोबाईल वर एका अनोळखी व्यक्तीने अश्रू ढाळत जीवाच्या आकांताने मदतीसाठी फोन केला रडत रडत त्यांच्या बाबत घडलेली घटना त्यांनी युनूस पठाण यांना व्यक्त केली.

क्षणाचाही विलंब न करता आपल्याला इतर विश्रांती व कामे यांपेक्षा सदर रुग्णसेवे संदर्भातील काम महत्त्वाचे असल्याने युनूस पठाण यांनी अति तातडीने रात्रीच्या पहाटे तीन वाजता तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे जाऊन सदर पीडित दुःखी कष्टी असणाऱ्या अनोळखी इसमाची प्रत्यक्ष भेट घेतली घडलेल्या प्रकाराची माहिती पूर्ण घेऊन त्यांनी सदर व्यक्तीला मदत करण्या च्या दृष्टिकोनातून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठता श्री राजेंद्र वाबळे साहेब यांच्याशी फोन वरून संपर्क साधला तसेच इसम नामे श्री मिथुन बर्डे मुक्काम पोस्ट घारगाव तालुका संगमनेर यांचे पत्नीच्या प्रसूती तील बिघाड तांत्रिक कारणामुळे मृत्युमुखी पडलेल्या जन्मजात बाळाला अंत्यविधी इतर कागदपत्रांची पूर्तता व दवाखान्याच्या बिला संदर्भी मदत करणे कामी सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांनी श्री राजेंद्र वाबळे साहेबांच्या सल्ल्याने रूग्णालय तेथील संबंधिताची मदत घेत मदत करण्याचा निर्णय घेतला.

अनोळखी इसम बाहेरगावचे रहिवासी पत्नीच्या प्रसूतीमध्ये झालेला बिघाड तांत्रिक अडचणी त्यात नवजात मुलगी असलेल्या बालकाचा मृत्यू या सर्वांनी प्रश्न समस्या अडचणींनी थांबवून अतिशय कष्ट झालेल्या दुखी झालेल्या इसम श्री मिथुन बर्डे यांना त्यांच्या दुःखात खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरातून मदत करणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोविड योद्धा युनूस पठाण यांची परिस्थिती आली युनूस पठाण यांनी सदर इसमाला मोठा धीर देत त्यांचे बिलाचे पैसे सवलतीत तसेच माफ करून कागदपत्रांची झुळवा झुळव व इतर प्रक्रिया करून रात्री साडे तीन वाजता पिंपरीतील लिंक रोड पत्रा शेड येथे प्रत्यक्ष जाऊन युनूस पठाण यांनी स्वतः तुरळक साधनांच्या हत्यारांच्या साह्याने स्मशानभूमी मध्ये अंत्यविधीसाठी खड्डा करून या ठिकाणी विधिवत सदर बालकाचे अंत्यविधी करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले.

याच बरोबरीने पिंपरी चिंचवडच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात माणुसकी आजही जिवंत असल्याचे उदाहरण व कार्य याला उजाळा दिला पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड शहर हे आज प्रगतशील तसेच स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच एकीकडे आपण शेजारी काय चाललं आहे याकडे कानाडोळा दुर्लक्ष करून पुढे जात असतानाच रुग्णसेवेत असंख्य उलटी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल खाजगी रुग्णालय एकीकडे दमदाटी धमकावून रुग्णांना मोफत सवलतीत उपचार नाकारून सक्तवसुलीने पैसे वसूल करत असतानाच , आपल्या शहराचा मानाचा स्वाभिमानाचा तसेच कार्याचा तसेच माणुसकीचा पायंडा आज महाराष्ट्रासाठी सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांनी निदर्शनास आणून दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून सध्या या गोष्टीची मोठी चर्चा होत असतानाच वृत्तपत्र सोशल मीडिया न्यूज पोर्टल तसेच विविध सामाजिक माध्यमांवर युनूस पठाण यांच्यावर कौतुकास्पद तसेच स्तुतीचा वर्षाव होत आहे यातून युनूस पठाण यांनी सोशल मीडिया वरती तसेच न्यूज माध्यमांवर बोलताना माझ्या कौतुका पेक्षा तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि पिंपरी चिंचवड असो महाराष्ट्रातील असो व कुणीही असो माणुसकी मानवता हा धर्म या दृष्टीने एकमेकांना सहाय्य आणि मदत करण्याची भावना वृद्धिवंत करा असा सल्ला दिला.

आज तरुणांनी तसेच सर्व लोकांनी एकमेकांना मदत सहकार्य हे केलेच पाहिजे अशी भूमिका आज न्यूज माध्यमांवर बोलताना योद्धा सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांनी व्यक्त केली. समाजासाठी रुग्णसेवेसाठी युनूस पठाण यांनी घेतलेल्या अविरत सेवेचा आज महाराष्ट्राच्या पटलावर ठसा उमटताना दिसत आहे युनूस पठाण यांना रुग्णसेवेसाठी आजवर असंख्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे मनोबल हे रुग्णसेवेत सातत्याने असल्याने असंख्य रुग्णांना त्यांच्या या रुग्णसेवेचा नेहमी फायदा होत आलेला आहे रुग्ण रुग्णाचे नातेवाईक यांच्याशी सौजन्याने वागण्या बरोबरीने त्यांची आर्थिक अडचण व इतर उपचारा संदर्भात असलेल्या प्रक्रिया युनूस पठाण यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याने पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्रात त्यांच्या नावाची गौरवशाली चर्चा आहे युनूस पठाण यांनी आपले कार्य आज समाजसेवेच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार सेवेतील मदतीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवले व जिवंत ठेवले आहे युनूस पठाण यांच्या या कार्याची सर्व स्तरात आज चर्चा होताना दिसते .