अधिकच्या पैशांसाठी कीर्तनकार प्रवाशाला मारहाण

0
36

रावेत, दि. 06 (पीसीबी) : कार मधील एसीसाठी अधिकचे पैसे मागत कार चालकाने कीर्तनकार प्रवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. ५) सकाळी रावेत येथे घडली. अविनाश दिगंबर कल्याणकर देशमुख (वय २४, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिराज जावेद इराणी (वय ३५, रा. चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणकर हे कार्यक्रमासाठी चिंचवड येथून मुंबईला जात होते. चिंचवड स्टेशन येथून प्रवाशी कार मधून जात असताना रावेत येथील एका पेट्रोल पंपावर कार थांबली. तिथे कार मधील एसीसाठी अधिकचे पैसे देण्याची कार चालक इराणी याने मागणी केली. त्याबाबत कल्याणकर आणि इराणी यांच्यात बाचाबाची झाली. इराणी याने कल्याणकर यांचे डोके कारच्या दरवाजावर मारून त्यांना जखमी केले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.