अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी घसरण, गौतम अदानी यांच्यावर लाच दिल्याचा गंभीर आरोप

0
81

आज बाजार उघडताच अदानी समूहाचे शेअर्स कोसळले आणि 20 टक्क्यांपर्यंत लोअर सर्किटवर गेले. वास्तविक गौतम अदानी यांच्यावर सौरऊर्जा प्रकल्प घेण्यासाठी लाच दिल्याचा आरोप आहे.

मुंबई : हिडेनबर्ग प्रकरणानंतर अदानी ग्रुप आणि गौतम अदानी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने सांगितले की, गौतम अदानी यांनी सौरऊर्जा प्रकल्प मिळविण्यासाठी $250 दशलक्ष लाच देण्याचे आश्वासन भारतीय अधिकाऱ्यांना दिले होते. न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने अदानीसह एकूण 7 जणांवर हा आरोप केला आहे. बाजार उघडण्यापूर्वी ही बातमी आली आणि बाजार उघडताच समूहाचे सर्व शेअर कोसळले. बहुतांश शेअर्समध्ये लोअर सर्किटला धडकले आहे.
अदानी समूहाचे शेअर्स कोसळले
अदानी एनर्जी सोल्युशनचे शेअर्स 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर आले आहेत. याशिवाय अदानी एंटरप्रायझेसमध्ये 10%, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 20%, अदानी पोर्ट्समध्ये 10%, अदानी पॉवरमध्ये 13%, अदानी टोटल गॅसमध्ये 15%, अंबुजा सिमेंट्समध्ये 10% लोअर सर्किट दिसत आहे. या बातमीमुळे आधीच दबावाखाली असलेल्या बाजारातील सेंटिमेंट आणखी कमकुवत झाले आहेत. निफ्टी 230 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे आणि 23300 च्या खाली घसरला आहे.
2100 कोटींची लाच दिल्याचा आरोप
यूएस जिल्हा न्यायालयाने सांगितले की 2020 ते 2024 दरम्यान, एका भारतीय अक्षय ऊर्जा कंपनीने सौर ऊर्जा पुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याचा मार्ग स्वीकारला. गौतम अदानी यांच्यावर 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम अमेरिकी आणि परदेशी गुंतवणुकदारांकडून उभारण्यात येणार होती. या संपूर्ण प्रकरणात गौतम अदानीशिवाय सागर अदानी, विनीत जैन यांच्यासह सात जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.