अदानी ग्रुपचा एनडीटीव्ही भारतीय भाषांमध्ये तब्बल 9 न्यूज चॅनेल सुरू करणार

0
220

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) : अदानी समुहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता एनडीटीव्ही विविध भारतीय भाषांमध्ये तब्बल 9 न्यूज चॅनेल सुरू करणार आहे. दि. 17 मे 2023 रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेणयात आला असून यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची परवानगी घेण्याच्या प्रस्तावास संचालक मंडळानं मान्यता दिली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर चॅनेल सुरू करण्याची तारीख स्टॉक एक्सचेंजला सांगितली जाणार आहे. AMG Media Networks ने दि. 30 डिसेंबर 2022 रोजी राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांच्याकडून NDTV मधील 27.26 टक्के भागभांडवल (शेअरर्स) एका उपकंपनीव्दारे विकत घेतले होते. त्यामुळे एएमजी मिडीयाचा एनडीटीव्हीमधील एकूण वाटा वाढून तो 64.71 टक्के इतका झालेला आहे.

हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर मोठया प्रमाणावर स्टॉकच्या किंमतीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एनडीटीव्ही च्या शेअरच्या किंमतीमध्ये सुमारे 39 टक्क्यांनी घसरण झाली होती. आता एनडीटीव्ही 9 प्रादेशिक भाषांमध्ये न्यूज चॅनेल सुरू असणार असल्याची माहिती समोर आली आहे.