अतिरिक्त आयुक्त पदावर चंद्रकांत इंदलकर

0
117

पिंपरी, दि. १९ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त (३) या पदाचा पदभार सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला असून याबाबत सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी २० सप्टेंबर १९८८ रोजी वायरलेस ऑपरेटर या पदापासून महापालिका सेवेची सुरूवात केली, त्यानंतर त्यांनी २० जुलै २०११ रोजी कामगार कल्याण अधिकारी, १६ जुलै २०१६ रोजी सहाय्यक आयुक्त, १४ ऑक्टोबर २०२० रोजी उप आयुक्त तसेच १९ मे २०२३ रोजी सह आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता तर आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार ८ जुलै २०२४ रोजी त्यांचेकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला असून १८ जुलै २०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त (३) या पदाचाही कार्यभार सोपविण्यात आला आहे.