अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली

0
575

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

राज्याच्या सत्ता समीकरणात झालेल्या बदलाचे हे पडसाद असल्याची चर्चा सुरू झाली असून जितेंद्र वाघ यांची बदली त्याचं अनुषंगाने आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर सद्या प्रशासकीय राजवट सुरू आहे.

अतिरिक्त पदी असलेले वाघ हे अत्यंत कार्यकुशल आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते मात्र त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच गुरवारी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आता महापालिका आयुक्त यांची बदली होणार असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे जितेंद्र वाघ यांना पुढे कोणत्या विभागाची आणि पदाची जबाबदारी देण्यात आली या बद्दल कुठलीही माहिती आदेशात दिल्या गेली नाही. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांच्या स्वाक्षरीने वाघ यांची बदली करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्तपदी विजय खोराटे यांची नियुक्ती

जितेंद्र वाघ यांच्या जागी सोलापूर महानगरपालिकेतील उपायुक्त विजय खोराटे या अभ्यासू अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.