अतिरक्त मुख्य सचिव म्हणून पुन्हा फडणवीसांच्या अत्यंत जवळचे अधिकारी प्रवीण परदेशी

0
179

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : एकनाथ शिंदे सरकारमध्ये प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार आहे. प्रशासकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती होणारंय. विशेष म्हणजे प्रवीण परदेशी हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे अधिकारी मानले जातात. फडणवीसांच्या कार्यकाळात ते अतिरिक्त मुख्य सचिव होते. शिंदे गट गुवाहाटीवरून गोव्यात परतल्यानंतर प्रवीण परदेशी यांनी एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती.

प्रवीण परदेशी यांच्याबाबत थोडक्यात
प्रवीण परदेशी 1985 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. परदेशी यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत विविध पदं भूषवली आहेत. परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिलंय. त्यांनी मुंबई महापालिकेत 2019 मध्ये आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती.महायुती सरकार असताना परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास तसंच महसूल या महत्त्वांच्या खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी परदेशी यांची आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली होती. आता परदेशी अतिरक्त मुख्य सचिव म्हणून मुख्यमंत्री कार्य़ालयात दिसतील. प्रवीण परदेशी हे फडणवीस यांच्या मर्जीतल्या लोकांपैकी एक अधिकारी असल्याचं मानलं जातं.