अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान निगडीत प्रबोधन पर्वानिमित्त विविध कार्यक्रम

0
917

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2022 निमित्त पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या विचार प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,  असे आवाहन  आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

   1 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधी दरम्यान निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानका शेजारील प्रांगणात विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वात विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये.  1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10.45 वाजता निगडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला आयुक्त पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.  

विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात दररोज सकाळी पारंपरिक सनई वादनाने करण्यात येणार आहे. विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळी 10.15 वाजता विविध हलगी पथकाद्वारे “हलगी वादनाची जुगलबंदी” सादर केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा “स्वरचंदन” हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.  दुपारी 1 वाजता शाहीर बापूराव पवार हे  “लेखणीचा बादशहा” हा शाहिरीचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी 2 वाजता विविध बँड पथकांमध्ये “बँड स्पर्धा” रंगणार आहे. सायंकाळी 4 वाजता अनिकेत जवळेकर यांचा “सुवर्ण लहरी” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  तर सायंकाळी  5 वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष   राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  त्यानंतर योगेश देशमुख यांचा “महाराष्ट्राचे लोकरत्न” हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार असून  विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता अरुण गायकवाड यांच्या “गौरव महाराष्ट्राचा” या कार्यक्रमाने होणार आहे.

2 ऑगस्ट रोजी विचार प्रबोधन पर्वाच्या दुस-या दिवशी सकाळी 10 वाजता पल्लवी घोडे यांचा “संगीत संध्या”  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  सकाळी 11 वाजता धनंजय खुडे यांचा “लोकशाहीरांना मुजरा” हा कार्यक्रम होणार आहे.  दुपारी 12 वाजता “पठ्ठा लहुजींचा” हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम लखन अडागळे हे सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 2 वाजता “संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंचे योगदान” या विषयावर  आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  या परिसंवादामध्ये डॉ.कुमार सप्तर्षी,  डॉ.शरद गायकवाड,  प्रा.सुभाष वारे,  प्रा. प्रदीप कदम हे मान्यवर सहभागी होणार आहेत.  सायंकाळी 4 वाजता  “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लहूजी वस्ताद यांचा गुण गौरव” हा गीतांचा कार्यक्रम गायिका वर्षा पवार हे सादर करणार आहेत. सायंकाळी 5 वाजता  राजू जाधव यांचा “मेरा भारत महान” हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.  सायंकाळी 7 वाजता “अण्णांची गौरवगाथा”  हा कार्यक्रम मनोज माझिरे सादर करणार आहेत. रात्री 8 वाजता ख्यातनाम गायिका राधा खुडे यांच्या “प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाने” प्रबोधन पर्वाच्या  दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.

3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांचे समाज विकास विभागाकडील विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन  शिबीर  तसेच  संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष नितीन घोलप यांचे संजय गांधी निराधार योजनासंबंधी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  सकाळी 10.30 वाजता शारदा मुंढे यांचा “एकपात्री प्रयोग” होणार आहे. “रांगोळी व नृत्य स्पर्धा” आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे संयोजक व पर्यवेक्षक कृतिका बावणे असणार आहेत.  सकाळी 11 वाजता शिवाजी सावंत, कोल्हापूर यांच्याद्वारे दांडपट्टा, तलवारबाजी इत्यादी खेळाचे प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत.  दुपारच्या सत्रात 12 वाजता कुमार पाटोळे यांचा “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम होणार आहे.  त्यांनतर दुपारी 2 वाजता उद्योगपती कमल परदेशी यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.  डॉ. हेमलता सोळवंडे  व  प्रिया झोंबाडे हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.  दुपारी 3 वाजता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मातंग समाज” या विषयावर आधारित महाचर्चा आयोजित करण्यात आली असून या महाचर्चेमध्ये पद्मश्री. गिरीष प्रभुणे,  अंबादास सकट,  अॅड.दयानंद भांगे,  प्रा.डॉ.धनंजय भिसे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.  

सायंकाळी 4 वाजता विशाल चव्हाण यांचा “शाहीरी  डफ कडाडला” हा संगीतमय कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी 5 वाजता “जागर रयतेचा” हा कार्यक्रम भारत लोणारे सादर करणार आहेत.  सायंकाळी 6 वाजता  अभिजित राजे यांचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित “संगीतमय कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.  सायंकाळी 7 वाजता निलेश देवकुळे हे “समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम” सादर करणार आहेत. रात्री 8 वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे यांच्या “प्रबोधनात्मक गीत गायन” या कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.
 
4 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात 8 वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत.  सकाळी 10 वाजता  सुरेश रंजवे  यांचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित “संगीतमय कार्यक्रम” होणार आहे. त्यांनतर सकाळी 11 वाजता रणजित खंडागळे हे “गीत गायनाचा” कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारच्या सत्रात 1 वाजता सचिन अवघडे यांचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित “गाण्याचा कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.  दुपारी 2 वाजता “मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाची सूत्रे” या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात केशव शेकावपुरकर, लालासाहेब शिंदे, प्रा.मोहन वानखेडे, पत्रकार जयंत जाधव हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी 4 वाजता थिएटर्स वर्कशॉप कंपनी प्रस्तुत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर  आधारित “मूक मिरवणूक” हे नाटक  आयोजित करण्यात आले आहे. तर सायंकाळी 6 वाजता “जल्लोष लोकशाहीराचा” हा संगीतमय कार्यक्रम ख्यातनाम गायक साजन बेंद्रे सादर करणार आहेत. रात्री 8 वाजता विचार प्रबोधन पर्वाच्या चौथ्या दिवसाची सांगता शैलेश लोखंडे यांच्या “लोकसंगीताच्या कार्यक्रमाने” होणार आहे.

5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ख्यातनाम गायक राहुल शिंदे यांचा “प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रम” आयोजित केला आहे. दुपारी 12 वाजता “गाथा लोकशाहीराची” हा कार्यक्रम मुकुंद वेदपाठक हे सादर करणार आहेत.  दुपारी 2 वाजता “वेध शिक्षणाचा गरज रोजगाराची” या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून  या परिसंवादात डॉ. बबन जोगदंड,  डॉ.किशोर खिलारे,  डॉ.यशवंत इंगळे,  संतोष कसबे  हे मान्यवर सहभागी होणार आहेत.  सायंकाळी 4 वाजता विष्णू शिंदे यांचा “प्रबोधनात्मक गीत गायन” हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता स्वाती महाडिक  यांच्याद्वारे  “गण गवळण लावणी बतावणी” चा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2022 या 5 दिवसीय कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 8 वाजता विजय उलपे यांच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित  “संगीतमय कार्यक्रमाने” होणार आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2022 निमित्त शहरातील युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून याबाबतची सविस्तर माहिती आयोजनावेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य संयोजक उल्हास जगताप यांनी दिली.