अण्णासाहेब मगर सहकारी बँक निवडणुकित प्रगती पॅनल विजयी

0
872

भोसरी, दि. १० (पीसीबी) – आरोप- प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या भोसरी येथील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या पंचवार्षीक निवडणुकित नंदकुमार लांडगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा विजय झाला. रविवारी झालेल्या निवडणुकिचा निकाल आज दुपारी जाहीर कऱण्यात आला. भाजप आमदार महेश लांडगे यांनी या पॅनलचे प्रमुख नंदू लांडे यांची उमेदवारी पात्र ठरविण्यासाठी थेट सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे प्रयत्न केले होते म्हणून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते आणि बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांच्या नेतत्वाखालील पॅनलला एकही जागा मिळालेली नाही.

विजयी उमेदवारांमध्ये स्वतः नंदकुमार लांडगे, राजेश सस्ते, गणेश पवळे, विजय गवारे, सीए अमेय दर्वे, सीए चेतन आहेर, रामदास काळजे, राजाराम ढेरंगे, संतोष भांगरे, सोनाली लांडगे, सुगंधा लांडे, राजश्री हुलावळे, मनोज बोरसे, शंकर मेटकरी, दीपक डोळस यांचा समावेश आहे.