अणुव्रत काव्य धारा व भव्य भिक्षु भजन संध्या कार्यक्रम

0
73

अणुव्रत समिति, पिंपरी चिंचवड आयोजीत अणुव्रत काव्य धारा व भव्य भिक्षु भजन संध्या कार्यक्रम थोपटे लाँन्स रहाटणी येथे उत्साहात पार पडला।

कार्यक्रमासाठी संगायक महेंद्र सिंह, ललीत श्यामसुखा, अमीत कांकरीया तसेच संगायीका विणा सेठीया यांच्या गायनाने सर्व गण माण्या भिक्षु भक्ताना मंत्रमुग्ध केले. सर्व जैन भक्ता बरोबर समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीनी उपस्थीती दिली. आमदार शंकर जगताप व आमदार उमा खापरे तसेच माजी महापौर संजोग वाघेरे तसेच इतर मान्यवर व्यक्तींनी उपस्थीती दिली पिंपरी चिंचवड महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया व सर्व संघाचे पदाधिकारी कार्यक्रमास आवर्जुन उपस्थीत होते.
सर्व मान्यवराचे स्वागतं तेरापंथ सभा पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रकाशजी गादिया, अणुव्रत समीतीचे अध्यक्ष श्री विकासजी छाजेड, व समीतीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी तेरापंथ महीला मंडल अध्यक्षा तथा युवक परिषद अध्यक्षांनी व अनुव्रत समीतीचे सर्व कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली व कार्यक्रम खुपच यशस्वीरित्या पार झाला.
अशी माहिती संदेश गादिया उपाध्यक्ष ह्यांनी दिली