अडीच लाखांचे दागिने हिसकावले

0
493

रावेत, दि. २६ (पीसीबी) – भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र आणि मंगळसूत्र असे दोन लाख 40 हजारांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी साडेअकरा वाजता पुणे-मुंबई महामार्गावर समीर लॉन्स जवळील ब्रिजखाली घडली.

याप्रकरणी महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पुणे-मुंबई महामार्गावर समीर लॉन्स जवळ असलेल्या ब्रिजखालून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरण आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 40 हजारांचे एक तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि दोन लाख रुपयांचे पाच तोळ्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे देहूरोडच्या दिशेने पळून गेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.