अटक होण्याची भीती दाखवत तीन लाखांची फसवणूक

0
116

भोसरी, दि. ११ (पीसीबी)

कंबोडिया देशात पार्सल जात असून त्यामध्ये तुम्हाला अटक होईल अशी भीती दाखवून अनोळखी व्यक्तींनी एका व्यक्तीची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 3 ते 6 सप्टेंबर या कालावधीत इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9153003895 क्रमांकावरून बोलणारी अनोळखी व्यक्ती, 916002116875 क्रमांकावरून बोलणारी अनोळखी व्यक्ती यशदीप व अनिल यादव, यूपी आयडी आणि बँक खाते धारक अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी फिर्यादीस फोन केला. फिर्यादी यांच्या नावाने कंबोडिया देशात पार्सल पाठवले जात असून त्या प्रकरणात त्यांना अटक होईल अशी भीती घालण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादी कडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये दोन लाख 98 हजार रुपये घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.