अटक करण्‍याची धमकी देत एक कोटी रुपयांची फसवणूक

0
70

चिंचवड, दि. 10 (प्रतिनिधी)

फ्राॅड केसमध्‍ये अटक करण्‍याची भिती दाखवत एका ज्‍येष्‍ठ नागरिकाची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना चापेकर चौक, चिंचवड येथे 4 ते 9 सप्टेंबर 2024 रोजी घडली.

याबाबत 60 वर्षीय ज्‍येष्‍ठ नागरिकाने सोमवारी (दि. 9) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीशी एसबीआय कस्टमर सर्व्हिसमधील अंकित यादव, मुंबई पोलीस ड्रेस घालून फिर्यादीशी व्हिडीओद्वारे बोलणारे पोलीस, सीबीआय मधील नवज्योत सिम्मी यांनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्याचे उद्देशाने पोलीस, सीबीआय अधिकारी व बँक कर्मचारी असल्याची तोतयागिरी केली. सुरेश अनुराग याने अडीच कोटी रुपयांच्‍या फ्रॉड केसमध्ये अटक करण्याची भिती दाखविली. फिर्यादीचे बँक खात्यातील रक्कम डिजीटल करन्सी चेक करुन ती व्हेरिफाय करुन परत करतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्‍याकडून एक कोटी आठ लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.