अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

0
243

हिंजवडी, दि. ११ (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे माण रोडवर घडली.

वामन भुसार (वय 60) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी वामन यांचे जावई संजय तुकाराम सुसर (वय 47, रा. माणरोड, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे वामन भुसार हे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे पायी चालत जात होते. माण रोडने चालत जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन मयत झाले. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.