अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
87

सांगवी, दि. 06 (पीसीबी) : भरधाव वेगातील गाडीने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दापोडी गावठाण ब्रिज, जुनी सांगवी येथे घडली.

आयनुद्‌दीन हुसेनमिया शेख (वय 78, रा. पवनानगर, जुनी सांगवी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अब्दुल कादर रशीदमिया शेख (वय 64) यांनी मंगळवारी (दि. 5) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल आणि मयत आयनुद्दीन हे 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दापोडी गावठाण ब्रिज, जुनी सांगवी येथून पायी चालले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या चॉकलेटी रंगाच्या गाडीने फिर्यादी यांचे दाजी आयनुद्दीन यांना जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आयनुद्दीन यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.