अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
289

खेड, दि. ०८ (पीसीबी)- अज्ञात वाहनाच्या धडकेत 45 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात खेड येथील बहुळ येथे शनिवारी (दि.6) रात्री घडला.

सचिन वसंत गायकवाड (वय 45) असे मयत इसमाचे नाव असून चाकण पोलीस ठाण्यात महेश गौतम कांबळे (वय 35 रा.कुरुळी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सख्खा चुलत मामा सचिन गायकवाड हे पायी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. मात्र वाहनचालक तेथे न थांबता तेथून पसार झाला.यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.