अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
404

आकुर्डी, दि. २४ (पीसीबी) – मैत्रिणी सोबत जात असलेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 23) पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे घडली.

गौरव संजय दीपक (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोपट अभिमान आठवले (वय 28, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र गौरव आणि त्याची मैत्रीण दुचाकीवरून पुणे ते आकुर्डी असे जात होते. आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरासमोर आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये गौरव हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा त्यात मृत्यू झाला. तर दुचाकी वरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली आहे. यात गौरवच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.