अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
48

चाकण, दि. २५ (पीसीबी) : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 17 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास शिक्रापूर चाकण रोडवर साबळेवाडी येथे घडला

रोहित पोपट पवार (वय 21, रा. साबळेवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद मारुती शिंदे (वय 30, रा. साबळेवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांच्या मामाचा मुलगा रोहित पवार हा त्याच्या दुचाकीवरून शिक्रापूर चाकण रोडने घरी जात होता. साबळेवाडी येथे आल्यानंतर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये रोहित याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.