अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
140

चिखली, दि. १६ (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात दोन सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास तळवडे रोड चिखली येथे घडला.

सिराज अब्दुल शेख (वय 35) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल दिलावर शेख (वय 66, रा. मुंबई) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सिराज शेख हा 2 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास तळवडे रोड चिखली येथून दुचाकीवरून जात होता. गणेश नगर जवळ आल्यानंतर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन सिराज याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.