अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
69

शिरगाव, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास भगतवस्ती, चांदखेड येथे घडली.नीतेश किसन कोकाटे (वय 20) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सार्थक महेंद्र गायकवाड (वय 12) असे गंभीर जखमी झालेल्या सहप्रवाशांचे नाव आहे. सोहम संतोष गायकवाड (वय 23, रा. कासारसाई, ता. मावळ, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 5) याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ सार्थ आणि कामगार नीतेश हे दोघेजण रविवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. ते चांदखेड येथील भगतवस्ती जवळ आले असता भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नीतेश कोकाटे याचा मृत्यू झाला तर सार्थक हा गंभीर जखमी झाला. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आरोपी अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पळून गेला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.