अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

0
113

सांगवी, दि. 12 जुलै (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 10) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास स्व. मनोहर पर्रीकर अंडरपास पिंपळे गुरव येथे घडली.

संकेत रविराज राजबिंडे (वय 30, रा. चऱ्होली बुद्रुक. मूळ रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी योगीराज रविराज राजबिंडे (वय 34) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगीराज यांचा भाऊ संकेत हा त्याच्या दुचाकीवरून पिंपळे सौदागर बाजूकडून भोसरीकडे जात होता. पिंपळे गुरव येथील स्व. मनोहर पर्रीकर अंडरपास येथे आल्यानंतर त्याच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये संकेत हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहनचालक पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.