अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

0
115

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) रावेत
रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 18) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास पुनावळे येथे घडली.

मयुर निवृत्ती ढोबळे यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन धोंडाराम पतंगे (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत मेहुणा गजानन पतंगे रस्ता ओलांडत असताना एका चारचाकी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये गजानन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर वाहनचालक वैद्यकीय मदत न करता पळून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.