अज्ञात कारणावरून डोक्यावर हत्याराने वार करत खून

0
626

कासारवाडी, दि. २५ (पीसीबी) – दोघांनी एका नागरिकाच्या पाठीवर डोक्यावर हत्याराने वार करत खून केला आहे याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपींचा शोध लावला दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत ही घटना शनिवारी (दि.23) सकाळी कासारवाडी येथील मेट्रो स्टेशन जवळ झाडाखाली घडली.

गौतम सोनकांबळे असे मयत व्यक्तीचे नाव असून भोसरी पोलिसांनी या प्रकरणात आसिफ इब्राहिम पटेल (वय 26 रा कासारवाडी) सादिक मियासाब शेख (वय 23 रा पिंपळे गुरव) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी मयत सोनकांबळे यांचा चुलत भाऊ शंकर सिद्धाराम कांबळे (वय 39 रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गौतम कांबळे याला सकाळी 11 वाजता कासारवाडी येथील मेट्रो स्टेशन जवळ मारहाण केली . यामध्ये त्यांनी हत्याराने गौतम यांच्या हातावर पायावर पाठीवर तसेच डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपी निष्पन्न केले व दोघींनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.