अजित पवार यांना धक्का, अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

0
66

अहिल्यानगर,दि. 21 (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या समवेत अजित पवार गटामध्ये असणाऱ्या सर्व नागवडे समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्यामध्ये अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी देखील पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर पुन्हा आता महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी राजीनाच्मा दिला आहे.