अजित पवार यांच्या हस्ते नाना काटे यांच्या गणेश मंडळात आरती

0
437

पिंपळे सौदागर, दि. ८ (पीसीबी) – गणेशउत्सवानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे माजी उमुख्यंमत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो सेवा मंडळ, क्रांती मित्र मंडळ, क्रांती क्रिडा मंडळ आदी मंडळाच्या श्री गणेशाची आरती आदरणीय दादा च्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदरणीय अजितदादा यांनी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली यावेळी नाना काटे व शितल काटे यांच्या वतीने दादा चा सत्कार श्री गणेशाची मुर्ती व शाल, पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. अजित गव्हाणे, माजी आमदार श्री. विलासशेठ लांडे, माजी महपौर श्री. संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक श्री. मयुर कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.