अजित पवार यांच्या विमान अपघाताचाप्राथमिक चौकशी अहवाल समोर

0
5

अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. आज त्यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित करत घातपाताची शंका उपस्थित केली होती.
दरम्यान, आता अजित पवार यांच्या विमान अपघाताचा एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात एएआयबीचा (AAIB) प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. हा अहवाल तब्बल २२ पानांचा प्राथमिक अहवाल आहे. या अहवालात अजित पवारांच्या विमान अपघाताची संभाव्य काही कारणे सांगण्यात आली आहेत. या अहवालात फक्त प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आलेले आहेत.

एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता, सुरक्षा त्रुटी आणि VFR (Visual Flight Rules) नियमांचे उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही, अशा त्रुटींकडे या अहवालात बोट ठेवण्यात आलं आहे.

प्राथमिक अहवालात काय निष्कर्ष मांडले?

-दुष्यमानता VFR मर्यादेपेक्षा कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न.-एअरफिल्ड सुविधांचे अपुरे मानक.-बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही-हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता.

-टेबल-टॉप रनवे – फिकट मार्किंग.
विमान झाडावर आदळलं
अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीत लँडिंग करत असताना धावपट्टी ११ वर पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला गेला. मात्र, पहिल्या प्रयत्नात गो-अराऊंड करण्यात आले. त्यानंतर पायलटने विमान दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लँडिंग क्लिअरन्सनंतर काही वेळातच हे विमान धावपट्टीच्या डावीकडे सुमारे ५० मीटर अंतरावर झाडांवर आणि भूभागावर आदळलं आणि त्यानंतर आगीत ते जळून खाक झालं, असं एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने प्राथमिक अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाला. मात्र, रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. तसेच CVR/FDR च्या सविस्तर विश्लेषणानंतर अपघाताचं कारण समोर येईल, असंही अहवालात म्हटलं आहे.

एएआयबीच्या अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे

-पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नानंतर गो अराऊंड.-पहिल्या लँडिंगचा प्रयत्न धावपट्टी ११ वर-दृश्यमानता कमी असताना लँडिंगचा प्रयत्न.-विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला ५० मीटरवर कोसळलं.-अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिटमधून “Ohh Shit” आवाज.-विमान अपघातावेळी आधी झाडांवर कोसळलं नंतर जमिनीवर.-अपघातानंतर विमानाला आग लागली.