अजित पवार यांच्या वाढदिवसाला दापोडीत वृक्षारोपन

0
382

दापोडी, दि. २२ (पीसीबी) – माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे यांच्या उपस्थितीत दापोडी फुगेवाडी प्रभाग पर्यावरण सेलच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आई गार्डन,दापोडी येथे संपन्न झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्यावरण सेल दापोडीच्या वतीने शहराध्यक्ष श्री. अजितभाऊ गव्हाणे यांच्या वाढदिवस पर्यंत ३०० झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, त्याची प्राथमिक सुरवात आज दापोडीतील आई गार्डन येथे २५ वृक्षारोपण करुन करण्यात आली.

यावेळी युवाह्रदय सम्राट नगरसेवक व कार्याध्यक्ष श्री.रोहित अप्पा काटे,नगरसेविका सौ.स्वाती माई काटे,मा.नगरसेविका सौ.संध्याताई गायकवाड,युवती अध्यक्षा कु.वर्षाताई जगताप,झोपडपट्टी सेल अध्यक्षा सौ.सुनिताताई आडसुळे,उपाध्यक्ष संदिप पाटील,सा.का.अरुण काटे पाटील,पर्यावरण प्रवक्त्या सौ.ज्योती जाधव ,पर्यावरण उपाध्यक्ष सुनिल कुवर,सामाजिक न्याय उपाध्यक्ष योगेश आयवळे,दापोडी प्रभाग अध्यक्ष गिरिश पतंगे,आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यावरण चिंचवड विधानसभा अध्यक्ष श्री.शैलेंद्र दिवेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन शहर उपाध्यक्ष मंगेश नवघणे आणि पर्यावरण मुख्यसरचिटणिस सुलेमान मामु शेख यांनी केले.