अजित पवार यांच्या उपस्थितीत नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज

0
171

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत काटे यांनी अर्ज दाखल केला. शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, काँँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच राष्ट्रवादीचे सर्व नेते यावेळी अवर्जून उपस्थित होते.

नाना काटे हे तगडे उमेदवार म्हणून त्यांना संधी देण्यात आली आणि महाआघाडी यावेळी नक्की ही जागा जिंकणार, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केेला. अजित पवार यांनी जातीने लक्ष घातल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह सर्वांची साथ असल्याने भाजपसाठी एकतर्फी असलेली लढाई आता कठिण होऊन बसली आहे.

दरम्यान, महाआघाडीकडून प्रबंळ दावेदार असलेले शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे हेसुध्दा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याने ही लढत आता तिरंगी होणार आहे. दुरंगी लढतीत भाजपच्या विरोधात जिंकणे सोपे होते, मात्र तिरंगी लढतीत मतविभागणीचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो, असा अंदाज आहे.