अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची आमदारकीच धोक्यात

0
406

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटाला हादरा बसणार अशा चर्चा सुरु झाल्या. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार त्यामुळेच अजित पवार यांना आपल्याकडे खेचून देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळली अशीही आणखी एक चर्चा सुरु होती. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याविरोधात भाजप, शिवसेना असा सामना होता. या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडी निर्माण झाली. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 उमेदवारांचा पराभव करून शिवसेनेचे आमदार निवडून आले होते.

अजित पवार यांनी आगामी निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि भाजपच्या सोबतीने लढविण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, आपल्या समर्थक आमदारांचे संख्याबळ वाढविण्यावर अजित पवार यांचा भर असणार आहे. त्यामुळे पराभूत झालेल्या जागांवर नेमका दावा कोण सांगणार हा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे शिंदे गटाच्या विद्यमान तेरा आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कोण आहेत ते तेरा आमदार?

मतदारसंघ शिवसेना उमेदवार मिळालेली मते राष्ट्रवादीचे उमेदवार मिळालेली मते
पाटण शंभूराज देसाई 106266 सत्यजित पाटणकर 92091
पैठण संदीपान भुमरे 83403 दत्तात्रय गोरडे 69264
परांडा तानाजी सावंत 106674 राहुल मोटे 73772
रत्नागिरी उदय सामंत 118484 सुदेश मयेकर 31149
कोरेगाव महेश शिंदे 101487 शशिकांत शिंदे 95255
एरंडोल चिमणराव पाटील 82650 अण्णासाहेब पाटील 64648
चोपडा लताबाई सोनवणे 78137 जगदीश्चंद्र वळवी 57608
वैजापूर रमेश बोरनारे 98183 अभय पाटील 39020
नांदगाव सुहास कांदे 85275 पंकज भुजबळ 71386
कुर्ला मंगेश कुडाळकर 55049 मिलिंद कांबळे 34036
कर्जत महेंद्र थोरवे 102208 सुरेश भाऊ लाड 84162
दापोली योगेश कदम 95364 संजय कदम 81786
राधानगरी प्रकाश आबीटकर 105881 के. पी. पाटील 87451