अजित पवार यांच्याबद्दल विचारणाऱ्या पत्रकाराला शरद पवार यांनी चांगलेच झापले

0
280

बारामती, दि. ६ (पीसीबी) : शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा काय केली, त्यानंतर संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मात्र याच दरम्यान सगळ्यांच्या लक्षात राहिले ते अजित दादा.. अजितदादांचा एकट्याचाच वेगळा सूर होता. कालही ते शरद पवार यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. ते दिल्लीला गेल्याच्याही बातम्या आल्या. या सगळ्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार बारामतीला पोहोचले. बारामतीकरांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राहून राहून अजित पवार यांचा प्रश्न विचारला. त्यावर पवार जरासे चिडलेले पाहायला मिळाले. त्यांनी अजित पवार यांच्यावरील प्रश्नाला फटकारलं आणि अजितदादांच्या बाबतीत चुकीचे वृत्त पसरवू नका, असं आवाहन केलं. अजित दादा हे वेगाने कामे करण्यात प्रसिद्ध आहेत, असंही शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं.

काही लोकांना मीडियासमोर चमकण्याचा छंद असतो, तो अजितदादांना नाहीये.. काही लोकांना वृत्तपत्रांमध्ये नावे यावी यासाठी ते कामे करतात तर काही लोक फक्त कामे करण्यासाठी प्रसिद्ध असतात अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे सर्वांना माहिती आहे. मी देखील जेव्हा कोणी भेटते तेव्हा त्यांची चर्चा करतो याचा अर्थ असा नसतो की, त्या चर्चा राजकीय असतात. मात्र अजितदादा जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा गैर अर्थ काढला जातो. माजी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया अजित दादांच्या बाबतीत चुकीची वृत्त पसरवू नका, असं पवार म्हणाले.

माझ्या या निर्णयाची संपूर्ण माहिती अजित पवार यांना होती. खुद्द मीच त्यांना दिली होती. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काहीही शंका काढण्याचे कारण नाही. ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना फिल्डवर कामं करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. अनेक जण त्यांना यासाठी ओळखतात, असंही पवार म्हणाले.