अजित पवार यांचा सीमा सावळे, आशा शेंडगे यांच्याकडून भगवान गौतम बुध्दांची ध्यानस्थ मूर्ती देऊन सन्मान

0
553

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – राज्यात नवीन सरकारचा शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात आले. शहरातील संस्था, संघटना नागरिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी अजितदादांचे जोरदार स्वागत केले. जेष्ठ नगरसेविका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे आणि माजी नगरसेविका आशा शेंडगे यांनी महापालिका भवनात अजितदादांना भगवना गौतम बुध्दांची ध्यानस्थ मूर्ती भेट देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी महापालिका आयुक्त शेखऱ सिंह, पोलिस आयुक्त विनायक चोबे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, विनया तापकिर उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुकाई चौक येथे ढोल ताशाच्या गजरात अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनने ५५० किलो वजनाचा हार आणि जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पाचशे फूट लांब फटाक्यांची माळ लावण्यात आली होती. वाल्हेकरवाडी येथे माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांनी अजितदादांचे स्वागत केले. चिंचवडगाव येथील चापेकर चौकात, चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात आणि पुढे मोरवाडी येथील अहिल्यादेवी चौकातही दणदणीत स्वागत झाले.

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा ऐकेकाळचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवारांना मानणारा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वर्ग आहे. अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबादेखील आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानतंर अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आले आहे
यानंतर अजित पवार महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. बैठक संपली की दुपारी दीड वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे अजित पवार काय बोलताना याकडे सर्वांचे लक्ष लागले