अजित पवार यांचा मास्टर स्ट्रोक,भाजपचे बलाढ्य माजी नगरसेवक संदीप वाघेरे राष्ट्रवादीत

0
24

पिंपरी, दि. २१ – भाजपने दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील अजित पवार यांच्याशी कट्टर असलेले राष्ट्रवादीचे १५ माजी नगरसेवक फोडले आणि मोठा धक्का दिला होता. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून संपूर्ण पॅनल विजयी कऱण्याची ताकद असलेल्या भाजपचे पिंपरीगावातील ताकदिचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.

पुणे शहरातील बारामती होस्टेल येथे स्वतः अजित पवार यांनी वाघेरे यांचे स्वागत केले. दरम्यान, वाघेरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे मिळून संपूर्ण पॅनल जिंकण्याची शाश्वती वाढली आहे.
महापालिका निवडणुकिसाठी माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे आणि ११ माजी नगरसेवकांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. या राजकीय घडामोडीने मोठी खळबळ उडाली. आता या भाजप प्रवेशाचे पडसाद उमटत आहेत. भाजपमधील अनेक ताकदिचे उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आले असून संदीप वाघेरे हे त्यापैकी एक नाव आहे. मावळ लोकसभा निवडणुकित संदीप वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी देऊ केली होती. संजोग वाघेरे यांच्या एवजी संदीप वाघेरे लोकसभा उमेदवार असते तर चित्र वेगळे दिसले असते, अशी अटकळ होती. पिंपरीगाव परिसरात संदीप वाघेरे यांनी महापालिकेशिवाय स्वखर्चानेदेखील कोट्यवधी रुपयांची कामे केल्याने त्यांना मोठा जनाधार आहे.
वाघेरे यांच्या राष्ट्रवादी उमेदवारीचा परिणाम परिसरातील दोन-तीन प्रभागांवर होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संजोग वाघेरे आणि त्यांची पत्नी उषा वाघेरे यांची जागासुध्दा आता धोक्यात आल्याचे मानले जाते.