अजित पवार गटाची पहिली यादी; 38 जणांची नावं जाहीर, कुणा- कुणाला संधी ?

0
4

मुंबई, दि. 23 (पीसीबी) – अजित पवार गटाची पहिली यादी; 38 जणांची नावं जाहीर, कुणा- कुणाला संधी ?

अजित पवार बारामतीतून अर्ज दाखल करणार

अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढवतील, तर २८ ऑक्टोबरला त्यांनी आपला अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती हे अजित पवारांचे गड मानले जाते, त्यामुळे त्यांच्या या उमेदवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

येत्या निवडणुकीत अजित पवार गटाने आणखी एक महत्त्वपूर्ण उमेदवार जाहीर केला आहे, ते म्हणजे येवला येथून छगन भुजबळ. भुजबळ हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांची उमेदवारी महत्वाची मानली जात आहे.

महिला सक्षमीकरणाकडे लक्ष

अजित पवार गटाने यादीत महिलांना सन्मानजनक स्थान दिले आहे. उदगीर येथून संजय बनसोडे, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच, राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना अर्जुनी मोरगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
अजित पवार गटाची संपूर्ण यादी

  • अजित पवार – बारामती
  • छगन भुजबळ – येवला
  • हसन मुश्रीफ-कागल
  • धनंजय मुंडे – परळी
  • नरहरी झिरवाळ – दिंडोरी
  • अनिल पाटील – अमळनेर
  • राजू कारेमोरे – तुमसर
  • धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
  • इंद्रनील नाईक – पुसद
  • चंद्रकांत नवघरे – वसमत
  • नितीन पवार – कळवण
  • माणिकराव कोकाटे – सिन्नर
  • दिलीप बनकर – निफाड
  • सरोज अहिरे – देवळाली
  • दौलत दरोडा – शहापूर
  • अदिती तटकरे – श्रीवर्धन
  • संजय बनसोडे – उदगीर
  • अतुल बेनके – जुन्नर
  • दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
  • दिलीप मोहिते – खेड – आळंदी
  • दत्तात्रय भरणे – इंदापूर
  • यशवंत माने – मोहोळ
  • सुनिल शेळके – मावळ
  • मकरंद पाटील – वाई
  • शेखर निकम – चिपळूण
  • अण्णा बनसोडे – पिंपरी
  • सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
  • राजेश पाटील – चंदगड
  • चेतन तुपे – हडपसर
  • किरण लहामटे – अकोले
  • संजय शिंदे – करमाळा
  • देवेंद्र भुयार – मोर्शी
  • आशुतोष काळे – कोपरगाव
  • संग्राम जगताप – अहमदनगर शहर
  • प्रकाश सोळंके – माजलगाव
  • बाबासाहेब पाटील – अहमदपूर
  • सना मलिक – अणुशक्तीनगर
  • नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
  • अमरावती शहर – सुलभा खोडके
  • इगतपुरी – हिरामण खोसकर