अजित पवार उद्या शहरात, गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण

0
217

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय वाकड, हिंडवडी आणि भोसरी येथील खासगी उद्याघटनासाठी ते अवर्जून उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी त्याबाबत प्रसिध्दीपत्र काढले आहे. उद्या शुक्रवार दि. २० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता प्राधिकऱणातील ग.दि.माडगुळकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा पवार तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.”गणेशोत्सव स्पर्धा २०२३” तसेच “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२३” बक्षीस वितरण समारंभ” त्यांच्या हस्ते होईल.

काका पुतण्यांचे दौरे वाढले –
आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शहरात वारंवार भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गणेशोत्सवात अनंक मंडळांना पहाटे चार पर्यंत ते स्वतः भेटले. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्याच्या पत्रकार परिषदेसाठी ते आले होते आणि पाठोपाठ शहरातील काही मान्यवरांना घरी जाऊन ते भेटले. माजी महापौर मंगला कदम यांची शाहूनगर येथे घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. सामाजिक क्षेत्रातील मानव कांबळे, मारुती भापकर यांच्याही भेटीचे त्यांचे नियोजन होते. शहरात संघट वाढीसाठी रोहित पवार आता वारंवार दौरे करत आहेत. त्या पार्श्वभूमिवर आता अजितदादांनीसुध्दा भेटीचे सत्र आरंभले आहे.