अजित पवारांसोबत किती आमदार ? आणि शरद पवारांसोबत किती ? पहा संपूर्ण यादी…

0
430

मुंबई,दि.०३(पीसीबी) – राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी करत अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यातच अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आणि खासदार आहेत? त्यांच्यासोबत पक्षातील कोण-कोणते नेते आहेत, याची संपूर्ण यादी आता समोर आली आहे.

अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार पुढील प्रमाणे –
अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), धर्मराव बाबा आत्राम (अहेरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), आदिती तटकरे (श्रीवर्धन) ,दत्तात्रय भरणे (इंदापूर), दौलत दरोडा (शहापूर), शेखर निकम (चिपळूण), सरोज अहिरे (देवळाली), किरण लहाने (अकोले), अशोक पवार (शिरूर), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), निलेश लंके (पारनेर) , सुनील भुसारा (विक्रमगड), अतुल बेनके (जुन्नर), संग्राम जगताप (अहमदनगर), आशुतोष काळे (कोपरगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील शेळके (मावळ), अण्णा बनसोडे (पिंपरी), दिलीप मोहिते (खेड आळंदी)

शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार पुढील प्रमाणे –
जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), राजेश टोपे (घनसावंगी), अनिल देशमुख (काटोल), जयंत पाटील (इस्लामपूर), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), शामराव पाटील (कराड उत्तर), प्रकाश सोळंके (माजलगाव), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), नवाब मलिक (अणुशक्ती नगर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), दीपक चव्हाण (फलटण), अशोक पवार (शिरूर), मकरंद जाधव (वाई), चंद्रकांत नवघरे (बसमत), इंद्रनील नाईक (पुसद), मानसिंग नाईक (शिराळा), नितीन पवार (कळवण), रोहित पवार (कर्जत जामखेड), राजेश पाटील (चंदगड), सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ), दिलीपराव बनकर (निफाड), यशवंत माने (मोहोळ), बबनराव शिंदे (माढा) संदीप क्षीरसागर (बीड)

ही यादी समोर आली असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणताही अधिकृत आकडा सांगितलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन ते तीन दिवसात याबाबत सांगणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी आमच्याकडे सर्व आमदार असून तुम्ही काही काळजी करू नका, असं म्हटलं आहे.