अजित पवारांनी फडणवीसांचे चॅलेंज स्वीकारले..

0
477

अजित पवारांनी फडणवीसांचे चॅलेंज स्वीकारले, कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही, विधानपरिषद निकालानंतर कळेल; अजितदादांचा दावा

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्यसभा निवडणुकांच्या निकालात शिवसेनेच्या उमे्दवाराचा पराभव झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राचे हिरो झालेले आहेत. आता राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीचाही निकाल लागेल, असा दावा आता भाजपाकडून करण्यात येतो आहे. भाजपाच्या सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. राज्यसभेत आम्ही काठावर पास झालो, असे वक्तव्य अजित परवारांनी केले आहे. पराभवनानवंतर माणूस शिकतो, असेही ते म्हणाले आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर, कुणाकड़े कौशल्य आहे स्पष्ट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

विधान परिषदेत अजितदादा विरुद्ध भाजपा संघर्ष

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अपक्ष उमेदवारांना मॅनेज करण्याचे कामही शिवसेनेकडे होते. त्यात राष्ट्रवादी आणि विशेषता अजित पवार फार सक्रिय नव्हते असे सांगण्यात येत होते. शरद पवारांनी निकालांनंतर फडणवीसांच्या केलेल्या कौतुकानंतर, तर अजित पवारांनीच पडद्याआड भाजपाला मदत केली का अशी चर्चाही रंगली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीत देहूच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न दिल्याने, अजित पवार आणि भाजपातील वितुष्ट वाढले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

खडसेंना पाडण्याचा भाजपाचा डाव

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी नुकत्याच केलेल्या एका गौप्यस्फोटानंतर भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेत पराभूत करण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना तिकिट दिले आहे. फडणवीसांच्या सरकारच्या कार्यकाळात भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना एकाअर्थी राजकीय विजनवास सुरु झाला होता. जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन हे फडणवीसांचे सर्वाधिक जवळचे नेते झाले होते. अशा स्थितीत खडसेंना पाडण्य़ासाठी आता फडणवीस आणि अजित पवार हे राजकीय मल्ल एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याची चर्चा आहे.
विधान परिषद निवडणूकही चुरशीची होणार

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळआला, तर विधान परिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळावा लागण्याची शक्यता आहे. १८ तारखेपासून भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतल्.या हॉटेलांत मुक्कामाला येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच ही निवडणूकही प्रतिष्ठेची होईल, अशी शक्यता आहे.