अजित गव्हाणे यांच्यासह शितोळे, शेट्टी, भोसले, शेख राष्ट्रवादीतून बडतर्फ

0
448

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना पाठिंबा दिल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या ११ पदाधिकाऱ्यांवर बडतर्फ कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदिश शेट्टी, राहुल भोसले आणि फजल शेख या चार कार्याध्यक्षांचा त्यात समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणाशी विसंगत व पक्षविरोधात कृती केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे त्यांनी पक्षाचे नाव, चिन्ह वापरू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जयंत पाटील यांनी या पत्रात दिला आहे.

कारवाई केलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांत बाबाजी जाधव (रत्नगिरी जिल्हाध्यक्ष. राजाराम मुळीक(वसई-विरार जिल्हाध्यक्ष). ए.बी. पाटील (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष), रविंद्र पगार (नाशिक जिल्हाध्यक्ष) माणिकराव विधाते (अहमदनगर जिल्हाध्यक्ष) आणि अभिजीत खोसे ( अहमदनगर कार्याध्यक्ष) यांचाही समावेश आहे.