अजितदादा म्हणले,माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर

0
235

१८ जुलै (पीसीबी) – गेल्या अनेक दशकांपासून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी, लोकप्रतिनिधी, पार्टी पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल, असा विश्वास आहे.