अजितदादा मुख्यमंत्री होणार म्हणत ज्येष्ठ व्यक्तीकडून सुनेत्रा पवार यांना आशिर्वाद…

0
102

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज बिबवेवाडी परिसरात नागरीकांच्या भेटी घेत आहेत. या दरम्यान, एका सोसायटीत एका ज्येष्ठ व्यक्तीनं सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले.त्यावर या ८८ वर्षीय आजोबांनी तुम्ही खासदार तर होणारच, पण अजितदादाही लवकरच मुख्यमंत्री होतील अशा शब्दात भावना व्यक्त करत सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रचाराच्या धामधुमीत विरंगुळा यासाठी सुनेत्रा पवार यांनी क्रिकेटचा आनंद देखील घेतला.
सुनेत्रा पवार या आज दत्तनगर, आंबेगाव परिसराच्या दौऱ्यावर असतांना या दरम्यान, त्यांनी विविध सोसायट्यांना भेट देत नागरीकांशी संवाद साधला.. लेक विस्टा सोसायटीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या महिलांसमवेत सुनेत्रा पवार याही सहभागी झाल्या आणि त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.