अजितदादा पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी पिंपरी शहरात

0
2
  • सकाळी ११ वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगणात दर्शना करिता

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर(जिल्हा) च्या वतीने उद्या मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी, 2026 रोजी, महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शना करिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगणात, मुंबई पुणे हायवे, पिंपरी येथे सकाळी 11:00 ते 03:00 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
आजी माजी खासदार, आमदार,नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित असणार आहेत, त्यानंतर सदर अस्थि देहू येथील इंद्रायणी नदी मध्ये विर्सजन करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.