अजितदादांनी बोलावली पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेवकांची तातडिची बैठक

0
68

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : महायुतीमध्ये जागेच्या मागणीसाठी बंडाचे निशान उगारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह सर्वाची तातडिची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाचारण केली आहे. बारामती येथील स्वप्नशिल्प या निवासस्थानी सायंकाळी बैठक निमंत्रीत केली आहे. १०-१२ वाहनांसह ४० माजी नगरसेवक बारामतीत पोहचले असून थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे.

आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपचा प्रचार कऱणार नाही, आजवर चिंचवडमध्ये विधानसभेसाठी भाजपचा प्रचार केला आता ही जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली होती. मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, विनोद नढे, मोरेश्वर भोंडवे, संतोष कोकणे आदी सहभादी झाले होते.
पिंपरी राखीव मतदारसंघात आमदार अण्णा बनसोडे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याने त्यांनी उमेदवारी दिली तर परभावची शक्यता अधिक असल्याचा सूर जेष्ठ नगरसेवकांनी लावला होता. भाजपच्या बैठकित पिंपरी राखीव मतदारसंघाची मागणी कऱण्यात आल्याने राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढली होती.

तिसऱ्या महत्वाच्या घटनेत जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी समर्थकांचा मेळाव घेत आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीत दरी निर्माण झाली.  राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही अस्वस्था पाहून अनेक नगरसेवकांनी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दिशेने तोंड वळवले होते. अनेकांनी थेट पवार साहेबांची भेट घेऊन बोलणी सुरू केल्याने दादांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले होते. आता अजितदादा या सर्व विषयांवर काय बोलतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

– बैठकिसाठी नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, संतोष कोकणे, माऊली सुर्यवंशी, राजेंद्र साळुंखे, निलेश डोके, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, जगदिश शेट्टी, संतोष कोकणे, श्रीधर वाल्हेकर, सतिष दरेकर, हरि तिकोणे, मनोज खानोलकर, जगदिश शेट्टी, योगेश बहल, मंगला कदम आदी बारामतीला रवाना झाले.