अजितदादांच्या हस्ते शुक्रवारी महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमीपूजने, उद्घाटने

0
238

पिंपरी दि. २ (पीसीबी)- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने होणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून त्यांच्या दौ-याला सुरुवात होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. प्रशासक राजवट लागू झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांद्या शहरात येत आहेत. विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजने करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका मुख्यालयातील उद्योग सुविधा कक्ष, सीएसआर सेलचे उद्घाटन, पोलिसांना पेट्रोलिंगकरिता 50 स्मार्ट बाईकचे हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता हॅण्ड हेल्ड डिव्हाईसचे वाटप, 6 फायर मोटार सायकल्स अग्निशामक विभागाला अजित पवार यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत. सकाळी साडेसात ते सव्वाआठ या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत.

साडेआठ वाजता सीएमई येथील रोईंग प्रशिक्षणाचे उद्घघाटन व पाहणी करणार आहेत. सव्वा नऊ वाजता भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानातील बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. पावणेदहा वाजता नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील हॉकी अॅकडमीचे उद्घघाटन होणार आहे. त्यानंतर सव्वादहा वाजता अजितदादा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देणार असून पाहणी करणार आहेत. पावणेअकरा वाजता तळवडे जॉगिंग ट्रॅक, उद्यानाचे उद्घघाटन करणार आहेत. तेथून सव्वा अकरा वाजता भक्ती-शक्ती येथील इको ट्रॅकचे भूमीपूजन करणार आहेत.

पावणेबारा वाजता थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमी येथील पॅव्हॅलीनचे उद्घाटनही अजितदादा करणार आहेत. त्यानंतर एक वाजता वाकड येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घघाटन, पिंपळेसौदागर कुणाल आयकॉन रोड अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घघाटन तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाच्या भूमीपूजननानंतर प्रशासकीय कार्यक्रमांची सांगता होणार आहे.