अजितदादांच्या शिष्टाईमुळे कार्यकर्त्यांची झाली गोची

0
88

पिंपरी, दि. १६ – पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांची सिट धोक्यात आल्याने खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टाई केली आणि अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. अजितदादांनी आसवाणी बंधुंशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचा विरोध कमी करण्यासाठी स्वता: लक्ष झातले. दरम्यान, डब्बू आसवाणी यांच्या विरोधात अत्यंत गंभीर स्वरुपाची तक्रार करणाऱ्या सुरेश निकाळजे यांनी याच घडामोडींवर एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केल्याने खळबळ उडाली आहे.
आसवाणी यांच्या विरोधआत आपल्या खांद्यावर बंदूक ठेवल्याची खंत निकाळजे यांना लागून राहिली आहे. आसवाणी बंधूंना विरोध करण्याच्या उद्देशाने निकाळजेसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार बनसोडे यांचा प्रचार सुरु केला. सुरेश निकाळजे यांनी माजी उहमहापौर डब्बू आसवाणी यांच्या विरोधात तक्रार केली होती. आता तेच आसवाणी अजितदादांना म्हणजेच आमदार बनसोडे यांच्याबरोबर येणार म्हटल्यावर निकाळजे संभ्रमात पडलेत.
फेसबूक पोस्ट मध्ये निकाळजे म्हणतात की, “आज कळाले की, राजकारणात कोण कुणाचे कायमचे शत्रु नसतात आणि कोण कोणाचे कायमचे मित्र नसतात. – पिंपरी विधानसभा… असो, जय भिम सर्वांना”. त्या पोस्टवर कमेंट करताना पत्रकार सुनिल कांबळे यांनी, “कार्यकर्त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, नाही तर नेत्यांच्या मागे भरकटत जावे लागते… असे म्हटले आहे. तर निकाळजे यांच्या पोस्टवर कमेंट कऱणाऱ्या दीपक साबळे यांनी म्हटले आहे की, शिष्टाईच्या नावावर कार्यकर्त्यांचे मरण… विजय कांबळे यांनी म्हटले आहे की, यालच तर राजकारण म्हणतात. अजितदादांच्या शिष्टाईमुळे आसवाणी बंधूंना विरोध म्हणून आमदार बनसोडे यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता गोची झाली आहे.