अजितदादांच्या शपथविधी नंतर रात्री १२ वाजता जयंत पाटलांची मोठी कारवाई, ‘हे’ आमदार ठरणार अपात्र

0
243

मुंबई, दि.४(पीसीबी) – राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ रविवारी झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसपक्षातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच बंड करून अजित पवारांसह नऊ जणांनी पक्षविरोधी कारवाई केली. या सर्वाविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळवले. यासोबतच ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवारांना ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आमदारांना कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी घेतल्याचं काही आमदारांनी सांगितल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर आपत्रतेची कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या बाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सोबत चर्चा देखील केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हा शपथविधी बेकायदेशीर असून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक आमदा

आमदारांना अंधारात ठेऊन त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, नऊ जण म्हणजे पक्ष नव्हे. त्यामुळे या नऊ जणांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे पाटील म्हणाले. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. पक्षाने ठरवलेला व्हिप हा अंतिम असतो, आणि जितेंद्र आव्हाड हेच राष्ट्रवादीचे व्हिप असतील. मी त्यांना जो आदेश देईन आणि ते जे सांगतील ते सर्व आमदारांना लागू होईल.