अजितदादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले; जय पवार उद्या पत्रकार परिषद घेणार

0
18

दि.०८ (पीसीबी) -अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी हा अपघात की घातपात, असा प्रश्न उपस्थित करत सलग पत्रकार परिषद घेत विविध शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे तपास यंत्रणांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घडामोडी सुरू असतानाच अजितदादांचे सुपुत्र जय पवार हे ९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते VSR कंपनीबाबत भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात ते कोणते नवे खुलासे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित पवार यांनी DGCA, CID आणि AAIB (विमान अपघात तपास ब्युरो) यांच्या तपास प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासातील तफावत आणि यंत्रणांचे दावे यामुळे या प्रकरणाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून असून त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह यांची भेट घेतली. तसेच ते काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.


९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन जय पवार नक्की काय खुलासे करणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान सहवैमानिकाच्या सीटवर झोपलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेवरून जय पवार यांनी DGCA कडे कठोर कारवाईची मागणी करत, चौकशी पूर्ण होईपर्यंत VSR कंपनीची सर्व विमाने ग्राउंड करण्याची मागणी केली होती.दरम्यान, रोहित पवार यांनी अजितदादांच्या पक्षातील काही नेते शांत असल्याची टीकाही केली आहे.या पार्श्वभूमीवर जय पवार यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.