अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त उपमहापौर डब्बू आसवानी यांचा उपक्रम

0
4

दि . २० ( पीसीबी ) – महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त मा.उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या मार्फत पिंपरी प्रभाग क्र.२१ व १९ मध्ये विशेष आधार कँम्प आयोजन.

पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील नागरिक पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे बहुतांशी नागरिकांस त्यांची आधार दुरुस्त करणे हि आवश्यकता बनली आहे.

तसेच कित्येक स्थानिक नागरिकांनाही त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढता येत नसल्याने व पुरेशी माहितीही नसल्याने आधार दुरुस्ती प्रलंबीत राहते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात बरेचदा अपूर्ण ज्ञानामुळे व आधार सेंटर कोठे आहेत, त्याची वेळ काय असते? तसेच आधार सेंटरवर प्रचंड गर्दी असल्यामुळे व मर्यादितच आधार नोंदणी व दुरुस्ती होत असल्यामुळे, पिंपरी प्रभाग क्र.२१ व १९ येथे मंगळवार दि.२२ जुलै २०२५ व बुधवार २३ जुलै २०२५ तसेच शुक्रवार दि.२५ जुलै २०२५ व २६ जुलै २०२५ सकाळी ११ वा पासून ते सायंकाळी ६.०० वा पर्यंत. विशेष आधार कँम्प आयोजित केला आहे.

विशेष आधार कँम्प होणाऱ्या गोष्टी

१) १८ वर्षा आतील नवीन आधार नोंदणी
२) मोबाईल नंबर लिंक करणे
३) आधार दुरुस्ती करणे
४) आधार अपडेट करणे.

आधार कार्ड बाबत आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:-

१) १८ वर्षा आतील नवीन आधार नोंदणी:- *जन्म दाखला *आई-वडील यांचे आधार कार्ड

२) आधार दुरुस्ती:- *गाजेट *विवाह नोंदणी प्रमाणपत्र *मतदान कार्ड

३) पत्ता बदलणे:- *रेंट अग्रीमेंट *लाईट बिल * फोटो

अधिक माहितीसाठी संपर्क :- आकाश:- 8788795854 / 9689846183