दि . ३ ( पीसीबी ) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराअंतर्गत पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणी त्याला 5 दिवसांची पोलील कोठडी सुनावली आहे.
शंतनू काकडे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचा उपाध्यक्ष आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी दोन अनाथ मुलींना पुण्यात शिक्षणासाठी अजित पवार गटाचा पदाधिकारी आणले होते. तुमचे शिक्षण पूर्ण करण्याचा खर्च करतो, नोकरीला लावतो असे आश्वासन देऊन त्याने मुलींना स्वतःच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. दरम्यानच्या काळात त्याने एका मुलीवर बलात्कार केला. तिच्यासोबत असलेल्या एका दुसऱ्या मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी मुलीने २९ मार्चला समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंतनू कुकडे याची एक ‘रेड हाऊस फाऊंडेशन’ नावाची एनजीओ चालवितो. या एनजीओचे कार्यालय नाना पेठेत आहे. या एनजीओच्या माध्यमातून आरोपी कुकडे हा गरजू लोकांना नोकऱ्या देणे किंवा त्यांना आर्थिक मदत करणे असे सामाजिक कार्य करीत होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने एका तरुणीशी तिला आश्रय देण्याच्या बहाण्याने ओळख निर्माण केली. त्याच्या एनजीओच्या कार्यालयात त्याने ती तरुणी आणि तिची एक मैत्रीण यांची राहण्याची व्यवस्था केली. एनजीओच्या इमारतीत त्याने या दोन्ही तरुणींवर बलात्कार केला.
दरम्यान, तरुणींनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शंतनू कुकडे याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
तसेच, आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीची ‘रेड हाऊस फाऊंडेशन’ नावाची एनजीओची नोंदणी कोणाच्या नावावर आहे याची माहिती धर्मादाय आयुक्तांकडून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या एनजीओचे आर्थिक स्त्रोत काय आहे याबद्दल अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त गिल यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा पदाधिकारी शंतनू कुकडे याने मुलींवर अत्याचार केला आहे. पीडित मुलीवर दबाव असतानाही तिने धाडस दाखवून तक्रार दाखल केली आहे. आरोपी शंतनूला तीन दिवसांपूर्वी अटक झाली आहे. आरोपी शंतनूला परदेशातून त्याच्या बँक खात्यावर रसद येते. गोरगरीब जनतेला आमिष दाखवून त्यांचे मतपरिवर्तन करत असतो, अशी आमची माहिती असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.