अजितदादांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड शहरात मोठ्ठा धक्का

0
165

अजितदादांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड शहरात मोठ्ठा धक्का

दि.१७ जुलै (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात मोठ्ठा धक्का बसला आहे. पक्षाचा राजीनामा देऊन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २४ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

पुणे येथे मोदी बागेत खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, महिलाध्यक्षा सुलक्षणा शिलवंत यावेळी उपस्थित होते.
प्रवेश करणाऱ्यांत प्रवेश केलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे-

  1. माजी महापौर हणमंतरावजी भोसले
  2. माजी महापौर वैशालीताई घोडेकर
  3. माजी नगरसेवक पंकज भालेकर
  4. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर
  5. माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे
  6. दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे
  7. दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने
  8. माजी नगरसेवक संजय नेवाळे
  9. माजी नगरसेवक वसंत बोराटे
  10. माजी नगरसेवक विजया तापकीर
  11. शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले
  12. माजी नगरसेवक समीर मासुळकर
  13. माजी नगरसेवक गीता मंचरकर
  14. माजी नगरसेवक संजय वाबळे
  15. माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे
  16. शुभांगी ताई बोराडे
  17. विनया ताई तापकीर
  18. माजी नगरसेविका अनुराधा गोफने
  19. माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर
  20. युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे
  21. शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे
  22. माजी नगरसेवक तानाजी खाडे
  23. माजी नगरसेवक शशिकीरण गवळी
  24. विशाल आहेर
  25. युवराज पवार कामगार आघाडी
  26. विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
  27. नंदूतात्या शिंदे
  28. शरद भालेकर