मुंबई, दि. 25 (पीसीबी) : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी प्रीतीसंगमावर गेले होते. शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार देखील प्रीती संगमावर गेले होते. इथून परतत असताना रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी रोहित यांना टोला लगावला. बच गया… काकाचं दर्शन घे दर्शन…, असं अजित पवार म्हणाले. यावेळी एकच हशा पिकला. रोहित पवारांनीही वाकून अजित पवारांना नमस्कार केला. शहाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? बेस्ट ऑफ लक असं अजित पवार रोहित पवारांना म्हटलं आहे.
कराडच्या प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. या काही सेकंदाच्या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. निवडणूक आणि प्रचारसभा यावरून अजित पवारांनी रोहित यांना टोला लगावला आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करून शरद पवार पुण्याच्या दिशेने रवाना झाले. रोहित पवार साताऱ्यातील स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलत होते. मग तिथून रोहित पवारही निघाले. त्याच वेळी अजित पवार प्रीतीसंगमावर येत होते. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांना पाया पडायला लावलं.